फिफा फुटबॉल वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू

देशात फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळला जात असला, तरी जगभरात फुटबॉल खेळाचे अनेक चाहते आहेत
फिफा फुटबॉल वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला येत्या २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरुवात होणार असून याची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी ३२ संघ सज्ज झाले असून आठ गट तयार करण्यात आले आहेत. १४ डिसेंबर आणि १५ डिसेंबर रोजी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे

अमेरिका आणि युरोपियन देशात फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळला जात असला, तरी जगभरात फुटबॉल खेळाचे अनेक चाहते आहेत. जगभरातील चाहत्यांमध्ये फुटबॉल वर्ल्डकपबाबत कमालीची उत्सुकता आहे.

प्रत्येक गटात चार संघ असणार आहेत. त्यातून दोन संघांची बाद फेरीत निवड होणार आहे. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच असे आठ गट आहेत.

साखळी फेरीत प्रत्येक संघाचे तीन सामने होणार आहेत. गटात दोन संघ अधिक गुणांसह पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांना बाद फेरीत प्रवेश मिळेल. बाद फेरीतून आठ संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in