FIFA World Cup : अखेर मेस्सीचे स्वप्न पूर्ण; अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा रोमहर्षक विजय

३६ वर्षांनी अर्जेंटिना संघाने फिफा विश्वचषक (FIFA World Cup) केला नावावर, अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मेस्सीची लक्षणीय कामगिरी
FIFA World Cup : अखेर मेस्सीचे स्वप्न पूर्ण; अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा रोमहर्षक विजय

फिफा विश्वचषक २०२२चा (FIFA World Cup 2022) अंतिम सामना फ्रांस (France) आणि अर्जेंटिना (Argentina) यांच्यात झाला. अखेर ३६ वर्षांनी अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक आपल्या नावावर केला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवला आणि इतिहास रचला. अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत आघाडी घेतली होती. मात्र, फ्रांसच्या एम्बाप्पेने एका मिनिटात दोन गोल करत सामना बरोबरीत काढला. त्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये देखील लिओनेल मेस्सीने (Lionel Mess) अर्जेंटिनाला १०८ व्या मिनिटाला आघाडी घेतली. मात्र, ११८ व्या मिनिटाला एम्बाप्पेने गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहचवला. यामध्ये अर्जेंटिनाने आपली कमाल दाखवत सामना ४-२ असा जिंकला.

१९८६मध्ये दिवंगत फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्षे विश्वचषकाने अर्जेंटिनाला हुलकावणी दिली.

मात्र, अखेर ३६ वर्षांनी पुन्हा एकदा मेस्सीने एकहाती सामना जिंकून देत ऐतिहासिक कामगिरी केली.

इतक्या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत अखेर त्याच्या नावावर विश्वविजेता खेळाडू असा टॅग लागला. या विश्वचषक सामन्यात मेस्सीने ७ गोल करत अविश्वसनीय कामगिरी केली.

विशेष म्हणजे अर्जेंटिनाकडून खेळताना मेस्सीचा हा अखेरचा सामना होता. त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. लिओनेल मेस्सीला गोल्डन बॉल हा पुरस्कार दिला गेला. तर, फ्रांसच्या कायलिन एमबाप्पेला गोल्डन बूट हा पुरस्कार मिळाला. त्याने स्पर्धेमध्ये ९ गोल्स मारले आहेत. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला गोल्डन ग्लोव्हस हा पुरस्कार दिला गेला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in