FIFA World Cup 2022 : मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का

क गटातील सामन्यात सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला. लिओनेल मेस्सी हा जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू असला तरी...
FIFA World Cup 2022 : मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का

(FIFA World Cup 2022) फिफा विश्वचषक 2022 मध्ये मंगळवारी म्हणजेच आज धक्कादायक निकालाची नोंद झाली. (Lionel Messi) लिओनेल मेस्सी च्या बलाढ्य अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का बसला. तेही तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाकडून. क गटातील सामन्यात सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला. लिओनेल मेस्सी हा जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू असला तरी आजवर त्याला एकही विश्वचषक आपल्या नावावर करता आला नाही. 

अत्यंत निराशाजनक सुरुवातीनंतर जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मेस्सी आणि अर्जेंटिना संघ मैदानात उतरला. पण कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिनाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकातील हा पहिला धक्कादायक निकाल आहे. सामन्याच्या सुरुवातीला 10व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. मात्र उत्तरार्धात सौदी अरेबियाने शानदार खेळ केला. सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा बचाव भेदून दोन गोल केले. अर्जेंटिनाने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र सौदी अरेबियाचा बचाव भेदून त्यांना गोल करता आला नाही. अर्जेंटिनाचा संघ गेल्या 36 सामन्यांतून अपराजित होता. ही विजयी मालिका सौदी अरेबियाने खराब केली. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in