FIFA World Cup 2026 : बेल्जियमचे तारे अपयशी; इराणविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री इराण आणि बेल्जियम यांच्यातील जी-गटातील अटीतटीचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
FIFA World Cup 2026 : बेल्जियमचे तारे अपयशी; इराणविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान
FIFA World Cup 2026 : बेल्जियमचे तारे अपयशी; इराणविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान
Published on

लॉस एंजेल्स : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री इराण आणि बेल्जियम यांच्यातील जी-गटातील अटीतटीचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. इराणचा गोलरक्षक अलिरेझा बैरानवंद या बरोबरीचा शिल्पकार ठरला. त्याने सात शानदार बचाव करताना बेल्जियमला रोखले. रोमेलू लुकाकू, केव्हिन डीब्रुएने असे बेल्जियमचे तारे पुन्हा निष्प्रभ ठरले.

सोफाय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना विजयाची सुवर्णसंधी होती. अमेरिकेकडून व्हिसा नाकारला जाणे आणि प्रवासावरील कडक निर्बंध यांमुळे इराणचा संघ अडचणीत होता. तरीही अनिवासी इराणी चाहत्यांनी स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघाला पाठिंबा दिला. चाहत्यांनी इराणी राष्ट्रगीताचा निषेध केला आणि सिंह अन् सूर्य चिन्हांकित शेकडो ध्वज फडकावून सरकारचा निषेध केला.

सामन्याच्या ६६व्या मिनिटाला बेल्जियमचा बचावपटू नॅथन न्गोय याने मेहदी तारेमीला गोल करण्यापासून चुकीच्या पद्धतीने रोखल्यामुळे त्याला थेट लाल कार्ड दाखवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in