FIFA World Cup 2026 : कोलंबिया-पोर्तुगाल सामना गोलशून्य बरोबरीत

कोलंबियाने फिफा विश्वचषकाच्या गट फेरीतील शेवटच्या सामन्यात पोर्तुगालला गोलशून्य बरोबरीत रोखले. या निकालासह कोलंबियाने ‘के गटात’ ७ गुणांसह अव्वल स्थान पटाकावले असून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
FIFA World Cup 2026 : कोलंबिया-पोर्तुगाल सामना गोलशून्य बरोबरीत
ANI
Published on

मियामी गार्डन्स : कोलंबियाने फिफा विश्वचषकाच्या गट फेरीतील शेवटच्या सामन्यात पोर्तुगालला गोलशून्य बरोबरीत रोखले. या निकालासह कोलंबियाने ‘के गटात’ ७ गुणांसह अव्वल स्थान पटाकावले असून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

हार्ड रॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी कोलंबियाच्या पिवळ्या जर्सीधारी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. या सामन्यापूर्वीच दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले होते. कोलंबियाचे प्रशिक्षक नेस्टर लोरेन्झो यांनी सांगितले की, “संघाने सामन्यात अधिक चांगला खेळ केला आणि विजयाचे श्रेय त्यांनाच जाते. आम्हाला संधी निर्माण करण्यात यश आले, मात्र फिनिशिंगमध्ये आम्ही कमी पडलो. ३२ अंश सेल्सिअस तापमानातही खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांशी जिद्दीने लढा दिला.”

कोलंबियाने सामन्यात २४ वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले, मात्र पोर्तुगालचा गोलरक्षक डिएगो कोस्टाने सहा बचाव करत त्यांना विजयापासून रोखले. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत डेव्हिन्सन सांचेझने हेडरद्वारे गोल केला होता, परंतु तो ऑफसाईड ठरवण्यात आला. बाद फेरीत कोलंबियाचा सामना ३ जुलै रोजी घानाशी होणार आहे, तर पोर्तुगालचा सामना क्रोएशियाशी होईल.

फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीचे वेळापत्रक

logo
marathi.freepressjournal.in