FIFA World Cup 2026 : मेक्सिको ४० वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरीत

सहयजमान मेक्सिकोने बुधवारी फिफा विश्वचषकात इक्वाडोरचा २-० असा पराभव केला. याबरोबरच त्यांनी तब्बल ४० वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा किंवा विश्वचषकातील नॉकआऊट सामना जिंकण्याचा पराक्रम केला.
FIFA World Cup 2026 : मेक्सिको ४० वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरीत
FIFA World Cup 2026 : मेक्सिको ४० वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरीतX
Published on

मेक्सिको सिटी : सहयजमान मेक्सिकोने बुधवारी फिफा विश्वचषकात इक्वाडोरचा २-० असा पराभव केला. याबरोबरच त्यांनी तब्बल ४० वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा किंवा विश्वचषकातील नॉकआऊट सामना जिंकण्याचा पराक्रम केला.

मेक्सिको सिटी येथे झालेल्या या लढतीत जुलियन क्विनोनेझ आणि राऊल जिमिनेझ यांनी पहिल्या सत्रात नऊ मिनिटांच्या अंतराने केलेल्या गोलच्या जोरावर मेक्सिकोने हा विजय मिळवला. मेक्सिकोने १९८६ मध्ये स्वतःच्या देशात झालेल्या विश्वचषकात बल्गेरियाला हरवल्यानंतर बाद फेरीतील एकही सामना जिंकला नव्हता. मेक्सिकोने १९९४ ते २०१८ दरम्यान सलग सात वेळा बाद फेरीत पराभव पत्करला होता, तर २०२२ मध्ये संघ गट फेरीच्या पुढे जाऊ शकला नव्हता. आता त्यांच्यासमोर उपउपांत्यपूर्व लढतीत इंग्लंड किंवा काँगो प्रजासत्ताकचे आव्हान असेल.

मेक्सिकोचे मुख्य प्रशिक्षक हाविएर अगिरे हे १९८६ मधील त्या ऐतिहासिक संघात मध्यरक्षक म्हणून खेळले होते. या विजयानंतर आनंद व्यक्त करताना अगिरे म्हणाले की, “बाद फेरीत पुढे जाण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंमध्ये माझाही समावेश होता, त्यामुळे हा विजय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”

पहिल्यांदाच मेक्सिकोकडून विश्वचषक खेळणाऱ्या २९ वर्षीय क्विनोनेझने २२व्या मिनिटाला पहिला गोल केला. यंदाच्या स्पर्धेत त्याचा हा तिसरा गोल असून तो विश्वचषक इतिहासात मेक्सिकोसाठी सर्वोच्च गोल करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. त्यानंतर ३१व्या मिनिटाला जिमिनेझने दुसरा गोल करत मेक्सिकोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर सहकाऱ्यांनी क्निनोनेझला हवेत उडवून जल्लोष केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in