FIFA World Cup 2026 : सेनेगलचा इराकवर ५-० ने मोठा विजय; बाद फेरीच्या आशा अद्यापही पल्लवित

बाद फेरीतील स्थानासाठी मोठ्या विजयाची गरज असताना, सेनेगलने इराकवर ५-० ने मात करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयामुळे सेनेगलच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 'आय' गटात ३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या सेनेगलला आता अन्य सामन्यांच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
FIFA World Cup 2026 : सेनेगलचा इराकवर ५-० ने मोठा विजय; बाद फेरीच्या आशा अद्यापही पल्लवित
FIFA World Cup 2026 : सेनेगलचा इराकवर ५-० ने मोठा विजय; बाद फेरीच्या आशा अद्यापही पल्लवित
Published on

टोरंटो (एपी) : बाद फेरीतील स्थानासाठी मोठ्या विजयाची गरज असताना, सेनेगलने इराकवर ५-० ने मात करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयामुळे सेनेगलच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 'आय' गटात ३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या सेनेगलला आता अन्य सामन्यांच्या निकालांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम आठ संघ बाद फेरीत प्रवेश करणार आहेत. या गटात फ्रान्स ९ गुणांसह पहिल्या तर नॉर्वे ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

सामन्याच्या सुरुवातीलाच चौथ्या मिनिटाला हबीब डियाराने गोल करत सेनेगलला १-० आघाडी मिळवून दिली. १३व्या मिनिटाला इराकचा बचावपटू रेबिन सुलाकाने सादियो मानेला रोखण्यासाठी त्याची जर्सी ओढली, त्यामुळे त्याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले. इराक १० खेळाडूंसह खेळत असूनही सेनेगलला ५६व्या मिनिटापर्यंत दुसरा गोल करता आला नाही. त्यानंतर इस्माइला सारने ५६व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर पापे गुयेने पेनल्टी क्षेत्राच्या बाहेरून दोन एनडियायने पाचवा गोल करत गोल नोंदवले, तर इलिमन सेनेगलचा विजय निश्चित केला.

सेनेगलचे प्रशिक्षक पापे थियाव म्हणाले की, "आमचे काम आम्ही पूर्ण केले आहे, परंतु आता आमचे भविष्य आमच्या हातात नाही. इराकचा संघ गुणतालिकेत एकही गुण न मिळवता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. १९८६ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणाऱ्या इराकचा प्रवास दुखापतग्रस्त आणि कठीण राहिला." इराकचे प्रशिक्षक ग्रॅहम अर्नोल्ड यांनी सांगितले की, "४० वर्षांनंतर विश्वचषकासाठी पात्र ठरणे हीच एक किमया होती."

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in