

इंगलेवुड (एपी): मिकेल मेरिनो पुन्हा एकदा स्पेनसाठी विश्वचषक स्पर्धेत तारणहार ठरला आहे. पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून येत अतिरिक्त वेळेत गोल करणाऱ्या मेरिनोने बेल्जियमविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यातही आपली जादू दाखवली.
बेल्जियमच्या बदली गोलरक्षकाकडून निसटलेल्या चेंडूचा अचूक अंदाज घेत मेरिनोने ८८व्या मिनिटाला विजयी गोल केला. या गोलच्या जोरावर स्पेनने शुक्रवारी बेल्जियमचा २-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत स्पेनचा सामना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या फ्रान्सविरुद्ध होईल.
या सामन्यात स्पेनकडून फॅबियन रुईझ याने ३० व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, ४१ व्या मिनिटाला बेल्जियमच्या चार्ल्स डी केतेलाएरे याने गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. स्पेनने या विश्वचषक स्पर्धेत स्वीकारलेला हा पहिलाच गोल ठरला. या गोलमुळे स्पेनचे गोलरक्षक उनाई सिमॉन यांचे सलग ६५० मिनिटे एकही गोल न स्वीकारण्याचा जागतिक विक्रम संपुष्टात आले.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात बेल्जियमचा मुख्य गोलरक्षक थिबॉत कोर्टोआ दुखापतग्रस्त विश्वचषक लॅमेन्स याला ८८ व्या ल स्पर्धा झाल्याने त्याला ७१ व्या मिनिटाला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या जागी आलेल्या सेन्ने मिनिटाला पाऊ कुबार्सीचा लाँग शॉट अडवताना चूक झाली. याच चुकीचा फायदा घेत ८६ व्या मिनिटाला मैदानात आलेल्या मेरिनोने आपल्या दुसऱ्याच टचवर गोल लगावला. उत्तरार्धात रोमेलू लुकाकू याने बेल्जियमला बरोबरी मिळवून देण्याचे प्रयत्न केले, परंतु आयमेरिक लापोर्ट याने इंज्युरी टाइममध्ये बेल्जियमची संधी हुकवली.
स्पेनने २०१० नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. "आम्ही येथे जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळण्यासाठी आलो आहोत," असे मेरिनो म्हणाला. स्पेनचे प्रशिक्षक लुईस डी ला फुएंटे यांनी सांगितले की, "हा दिग्गजांमधील सामना असेल आणि आमचा संघ फ्रान्सविरुद्ध जिंकण्यास पूर्णपणे सक्षम आहे."
दुसरीकडे, बेल्जियमचे प्रशिक्षक रुडी गार्सिया यांनी दुर्दैवी पराभवाबद्दल खंत व्यक्त केली, तर डिफेंडर ब्रँडन मेकेले याने संघाच्या कामगिरीवर अभिमान असल्याचे नमूद केले. या विजयासोबतच स्पेनची मार्च २०२३ पासून सलग ३७ सामन्यांमधील अजिंक्य घोडदौड कायम राहिली आहे, तर बेल्जियमची १८ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. स्पेनने यंदाच्या फिफा विश्वचषकात आपल्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये एकही गोल प्रतिस्पर्ध्याकडून पत्करला नाही. त्यांचा गोलरक्षक उनाय सिमन याने विश्वचषकात ६५० मिनिटे एकही गोल प्रतिस्पर्ध्याकडून पत्करलेला नव्हता. त्याचा हा विक्रम आज मोडीत निघाला. बेल्जियमला या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. बेल्जियमने गोल करण्याच्या मोजक्याच संधी निर्माण केल्या. चार्लस डे केटेलाएरे याने ४१ व्या मिनिटाला केलेला गोल बेल्जियमसाठी बरोबरी साधणारा ठरला होता. या सामन्यात गोलरक्षक थिबॉत कोर्टोआ याची जशी उणीव बेल्जियमला जाणवली तशीच कर्णधार यौरी टिलेमानस याचीही भासली. टिलेमानस याला सराव करताना दुखापत झाल्याने या सामन्यातून वगळण्यात आले होते.
स्पेनची विश्वचषकातील कामगिरी
स्पेनने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात फक्त तीन वेळाच अंतिम चार जणांमध्ये धडक मारली आहे.
१९५० मध्ये स्पेनला अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या चार संघांमध्ये (उरुग्वे, ब्राझील, स्वीडन आणि स्पेन) चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. स्पेनने फक्त एका गुणाची कमाई केली होती. उरुग्वेने ५ गुणांसह जेतेपद पटकावले, तर ब्राझील (४ गुण) आणि स्वीडनला (२ गुण) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
२०१० मध्ये स्पेनने अंतिम फेरीत नेदरलँड्सचा १-० असा पराभव करत पहिल्यांदा फिफा विश्वचषकाला गवसणी घातली होती. आंद्रेस इनिएस्टाने ११६व्या मिनिटाला केलेला 'गोल्डन गोल' स्पेनच्या जेतेपदात महत्त्वपूर्ण ठरला होता.
यंदाच्या विश्वचषकात केप व्हर्डेसारख्या छोट्याशा राष्ट्राने स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गटसाखळीत नंतर दोन विजय मिळवल्यानंतर स्पेनने बाद फेरीत ऑस्ट्रिया (३-०), पोर्तुगाल (१-०) आणि बेल्जियमला (२-१) अशी धूळ चारत अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवले आहे.