FIFA World Cup 2026 : ऑस्ट्रियाविरुद्ध स्पेनचे पारडे जड; पोर्तुगाल-क्रोएशिया लढतीकडे लक्ष

फिफा विश्वचषकातील बाद फेरीत गुरुवारी रंगणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. एकीकडे लॅमिन यमालचा समावेश असलेल्या स्पेनची ऑस्ट्रियाशी गाठ पडेल, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ क्रोएशियाविरुद्ध दोन हात करणार आहे. तसेच स्वित्झर्लंड आणि अल्जेरिया आमनेसामने येतील.
पोर्तुगाल-क्रोएशिया लढतीकडे लक्ष
पोर्तुगाल-क्रोएशिया लढतीकडे लक्ष
Published on

ईस्ट रदरफोर्ड : फिफा विश्वचषकातील बाद फेरीत गुरुवारी रंगणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. एकीकडे लॅमिन यमालचा समावेश असलेल्या स्पेनची ऑस्ट्रियाशी गाठ पडेल, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ क्रोएशियाविरुद्ध दोन हात करणार आहे. तसेच स्वित्झर्लंड आणि अल्जेरिया आमनेसामने येतील.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी आता ३२ संघांनी बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली असून प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे थरार आणखी वाढणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत मेक्सिको, ब्राझील, मोरोक्को, पॅराग्वे, फ्रान्स, नॉर्वे या संघांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठलेली असून जर्मनी व नेदरलँड्स या संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे.

आजचे सामने

  • स्पेन वि. ऑस्ट्रिया - (मध्यरात्री १२.३० वाजता)

  • पोर्तुगाल वि. क्रोएशिया - (शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता)

  • स्वित्झर्लंड वि. अल्जेरिया - (शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in