अखेर प्रतीक्षा संपली! अल्टिमेट खो-खो लीगला आजपासून सुरुवात होणार

२०१९मध्ये सर्वप्रथम अल्टिमेट लीगच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली; परंतु विविध कारणांनी ही लीग पुढे ढकलण्यात आली.
अखेर प्रतीक्षा संपली! अल्टिमेट खो-खो लीगला आजपासून सुरुवात होणार

अखेर तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. महाराष्ट्रातील खो-खो खेळाला जगभरात घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगला रविवारपासून सुरुवात होणार आहे. बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सायंकाळी ७ वाजता मुंबई खिलाडीज आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणाऱ्या लढतीद्वारे अल्टिमेट लीगचा शुभारंभ होईल.

२०१९मध्ये सर्वप्रथम अल्टिमेट लीगच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली; परंतु विविध कारणांनी ही लीग पुढे ढकलण्यात आली. आता तीन वर्षांनी सहा संघांसह २१ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.

रविवारीच होणाऱ्या दुसऱ्या लढतीत चेन्नई क्वीक गन्स आणि तेलुगू योद्धाज आमने-सामने येतील. सोनी क्रीडा वाहिन्यांवर मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलुगू भाषेत या स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून ४ सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in