टेबल टेनिस लीगसाठी पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव, हा ठरला सर्वात महागडा खेळाडू...

आयपीएलच्या धर्तीवर आता टेबल टेनिस लीगचे आयोजन करण्यात येणार आहे
 टेबल टेनिस लीगसाठी पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव, हा ठरला सर्वात महागडा खेळाडू...
Umang Gajjar
Published on

आयपीएलच्या धर्तीवर आता टेबल टेनिस लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आयपीएलसारखाच खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. त्यांत गुजरातचा मानुष शाह सर्वात महागडा खेळाडू ठरला. टेबल टेनिस लीगसाठी खेळाडूंचा लिलाव होण्याची ही देशातील पहिलीच वेळ ठरली. गुजरात स्टेट टेबल टेनिस असोसिएशन आयोजित गुजरात सुपर लीग जूनच्या अखेरीस अहमदाबाद येथे होणार आहे.

वडोदराच्या डाव्या हाताच्या मानुष शाहची मूळ किंमत ३० हजार रुपये होती मात्र तो सुमारे चौपट महाग विकला गेला. त्याला आनंदच्या टॉप नॉच अचिव्हर्सने १.११ लाखांना विकत घेतले. त्याचवेळी महिलांमध्ये तेलंगणाची श्रीजा अकुला सर्वात महाग ठरली. राष्ट्रीय चॅम्पियन श्रीजाची मूळ किंमत ३० हजार होती. त्याला भयानी स्टार्सने तिला ९६ हजार रुपयांत खरेदी केले. पहिल्या सत्रात आठ वेगवेगळे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक फ्रँचायझीकडे २.७५ लाख रुपयांची पर्स होती. प्रत्येक संघात जास्तीत जास्त सात खेळाडू असणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in