मुंबई इंडियन्स इमिरेट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा 'या' माजी वेगवान गोलंदाजाची नियुक्ती

“शेन बाँड, पार्थिव, रॉबिन सिंग, विजय आणि जेम्स यांच्यावर मुंबई इंडियन्स इमिरेट्स संघाच्या विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत
 मुंबई इंडियन्स इमिरेट्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा 'या' माजी वेगवान गोलंदाजाची नियुक्ती

इंटरनॅशनल लीग टी-२० स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स इमिरेट्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघातील पार्थिव पटेल आणि आर. विनय कुमार या दोघांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. जेम्स फ्रँकलिन हा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या भूमिकेत असेल. तर रॉबिन सिंग हे महाव्यवस्थापक (क्रिकेट) ही भूमिका निभावतील.

“शेन बाँड, पार्थिव, रॉबिन सिंग, विजय आणि जेम्स यांच्यावर मुंबई इंडियन्स इमिरेट्स संघाच्या विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. बराच काळ मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या या सर्वांनीच आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स इमिरेट्स संघालाही ते एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील आणि चाहत्यांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतील, अशी आशा आहे,” असे मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा अध्यक्ष आकाश अंबानी याने सांगितले.

पार्थिव आणि विनय यांनीही प्रशिक्षक म्हणून पदार्पण केले आहे. इंटरनॅशनल लीग टी-२० पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. शेन बाँड हा २०१५पासून मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आता त्याच्यावर इमिरेट्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in