Frank Duckworth: डीएलएस पद्धतीचा शोध लावणाऱ्या डकवर्थ यांचे निधन

DLS method: डीएलएस हा शब्द तुम्ही क्रिकेट सामन्यांदरम्यान अनेकदा ऐकला असेल. पावसामुळे प्रभावित झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे निकाल निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जातो. ही पद्धत शोधणाऱ्या फ्रँक डकवर्थ यांचा मंगळवारी मृत्यू झाला.
Frank Duckworth: डीएलएस पद्धतीचा शोध लावणाऱ्या डकवर्थ यांचे निधन
@TheBarmyArmy/ X
Published on

नवी दिल्ली : डीएलएस हा शब्द तुम्ही क्रिकेट सामन्यांदरम्यान अनेकदा ऐकला असेल. पावसामुळे प्रभावित झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे निकाल निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जातो. ही पद्धत शोधणाऱ्या फ्रँक डकवर्थ यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ते ८४ वर्षांचे होते.

इंग्लंडचे सांख्यिकीशास्त्रज्ञ डकवर्थ यांनी टोनी लुईससह १९९७ मध्ये ही पद्धत शोधून काढली. झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात १ जानेवारी, १९९७ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ही पद्धत प्रथमच स्वीकारली होती.

झिम्बाब्वेने हा सामना ७ धावांनी जिंकला. १९९९च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली. टोनी लेविस यांचेही चार वर्षांपूर्वी निधन झाले.

logo
marathi.freepressjournal.in