फ्रेझर-प्राइसने शंभर मीटर शर्यतीत पटकाविले सुवर्णपदक

फ्रेझर-प्राइसने दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन एलेन थॉम्पसन हेराचा मीट विक्रम (७२ सेकंद) मागे टाकला
फ्रेझर-प्राइसने शंभर मीटर शर्यतीत पटकाविले  सुवर्णपदक
Published on

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या जमैकाच्या शेली-एन फ्रेझर-प्राइसने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये शंभर मीटर शर्यतीत १०.६७ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकाविले. तिने वर्षातील सर्वोत्तम वेळेची नोंद केली. डायमंड लीगमध्ये फ्रेझर प्राईसने गेल्या महिन्यात केनियातील किप किनो क्लासिकमध्ये नोंदविलेल्या वेळेची बरोबरी केली. दरम्यान, पुढील डायमंड लीग ३० जून रोजी स्टॉकहोम, स्वीडन येथे होणार आहे.

विशेष म्हणजे फ्रेझर-प्राइस पाच वर्षाच्या मुलाची आई आहे. या वयातही तिने सुवर्णपदक पटकाविण्याचा चमत्कार केला. फ्रेझर-प्राइसने दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन एलेन थॉम्पसन हेराचा मीट विक्रम (७२ सेकंद) मागे टाकला. हा विक्रम हेराने गेल्या वर्षी केला होता. पस्तीस वर्षीय फ्रेझर-प्राइस आता पुढील महिन्यात होणाऱ्या दहाव्या जागतिक चॅम्पियनशिपसाठी ओरेगॉनला जाणार आहे.

दरम्यान, बहरीनच्या विनफ्रेड यावीने महिलांच्या तीन हजार स्टीपलचेसमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ८.५६.५५ सेकंदासह सुवर्णपदक जिंकले. या हंगामातील ही सर्वोत्तम वेळ ठरली.

युक्रेनच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या यारोस्लाव्हा महुचिखनेही महिलांच्या उंच उडीत २.०१ मीटर गुणांसह सुवर्णपदक जिंकले. चालू हंगामातील ही सर्वोत्तम धावसंख्याही आहे. युक्रेनच्या इरिना गेराश्चेन्को आणि युलिया लेव्हचेन्को यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. दक्षिण आफ्रिकेचा धावपटू लक्सोलो एडम्सने पुरुषांच्या दोनशे मीटरमध्ये १९.८२ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. डॉमिनिकन रिपब्लिकच्या अलेक्झांडर ओगांडोने २०.०३ सेकंदात दुसरे स्थान पटकाविले. युनायटेड स्टेट्सच्या डेव्हन ऍलनने पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत तर नायजेरियाच्या टोबी अमुसनने महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत विजेतेपद पटकावले.

logo
marathi.freepressjournal.in