उमेश यादवला मित्रानेच दिला दगा, तब्बल ४४ लाखांची फसवणूक

उमेश यादवचा जुना मॅनेजर असलेल्या मित्राने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शैलेश ठाकरे असे आरोपीचे नाव
उमेश यादवला मित्रानेच दिला दगा, तब्बल ४४ लाखांची फसवणूक
Published on

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची (Umesh Yadav) ४४ लाखांची फसवणूक झाली आहे. मूळचा नागपूरचा असलेला उमेश यादव सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या संघाचा भाग नाही. उमेश यादवचा जुना मॅनेजर असलेल्या मित्राने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शैलेश ठाकरे असे आरोपीचे नाव आहे.

प्लॉट देण्यासाठी आरोपी शैलेश ठाकरे याने उमेश यादवकडून ४४ लाख घेतले होते. मात्र आरोपींनी परस्पर स्वत:च्या नावावर प्लॉट खरेदी केला. त्यामुळे उमेशची ४४ लाखांची फसवणूक झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपी शैलेश ठाकरे याच्याविरुद्ध नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. 

logo
marathi.freepressjournal.in