
हाँगकाँगविरुद्ध हार्दिक पंड्याला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिल्याने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कर्णधार रोहित शर्मावर टीका केली आहे. “मी हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतला कधीच घेतले नसते. मूळात हार्दिकला विश्रांती देण्याची गरज नव्हती, असे मला वाटते. त्यातच आपल्याकडे दीपक हुडासारखा खेळाडू असताना त्याची निवड करणे योग्य ठरले असते. वेळप्रसंगी तो षटकेही टाकू शकला असता. दिनेश कार्तिकच्या जागी पंतला संधी दिली असती तरी चालले असते,” असे गंभीर म्हणाला.