पृथ्वी शॉ बद्दल गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

पृथ्वी शॉ बद्दल गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

गौतम गंभीर यांनी २३ वर्षीय पृथ्वी शॉबद्दल स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “पृथ्वी शॉसारख्या खेळाडूकडे कोणत्या प्रकारची...
Published on

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पृथ्वी शॉला डावलल्याने माजी खेळाडू गौतम गंभीर यांनी संताप व्यक्त केला. भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका केली. पृथ्वी शॉवर लक्ष देण्याची मागणी केली. गौतम गंभीर यांनी २३ वर्षीय पृथ्वी शॉबद्दल स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “पृथ्वी शॉसारख्या खेळाडूकडे कोणत्या प्रकारची प्रतिभा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. खेळाडूच्या प्रतिभेला दिशा देण्याचे काम व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांचे असते. प्रशिक्षक कशासाठी आहेत? निवडकर्ते कशासाठी आहेत? प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांनी या मुलांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ”

logo
marathi.freepressjournal.in