
नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित एनएससीआय अखिल भारतीय स्नूकर ओपन (बॉल्कलाइन) स्पर्धेच्या फेज वनमधील तिसऱ्या फेरीत विशाल गेहानी याने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चुरशीच्या सामन्यात फैसल खान याच्यावर ३-१ (४४-६७, ५८-५३, ५१-४०, ४९-३४ असा विजय मिळवला.
त्यानंतर झालेल्या अन्य रंगतदार लढतींमध्ये करन चुग याने जिगर शाहविरुद्ध पाच फ्रेममधील शेवटच्या दोन फ्रेम जिंकत ३-२ (६१-१५, ३२-५४, ३२-६०, ७२-४०, ५८-२४) अशी मात केली. बाबू गायकवाड यानेही वरुण मोदी याचा त्याच फरकाने म्हणजे ३-२ (४५-५२, ६२-०२, ७०-३८, ४३-६३, ६०-५१) असा पराभव केला.