आशियाई क्रीडा स्पर्धेत दिसणार योगासनांची झलक, २०२६च्या स्पर्धेत प्रात्यक्षिक कार्यक्रम म्हणून समावेश

वर्ष २०२६ मध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा प्राचीन खेळ योगासनांचा प्रात्यक्षिक कार्यक्रम म्हणून समावेश करण्यात आला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत दिसणार योगासनांची झलक, २०२६च्या स्पर्धेत प्रात्यक्षिक कार्यक्रम म्हणून समावेश
Freepik
Published on

नवी दिल्ली : वर्ष २०२६ मध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा प्राचीन खेळ योगासनांचा प्रात्यक्षिक कार्यक्रम म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धेतून जगाला विविध योगासनांची झलक अनुभवायला मिळणार आहे.

ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाची ४४ वी सभा नुकतीच पार पडली. या सभेत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कॅलेंडरमध्ये प्रात्यक्षिक खेळ म्हणून योगासनाचा समावेश एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेत भारताचे रणधीर सिंग यांची २०२४ ते २०२८ या चार वर्षांच्या कालावधीसाठी आशियाई ऑलिम्पिक परिषद (ओसीए) अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

रणधीर सिंग म्हणाले की, जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत योगासनाचा प्रात्यक्षिक कार्यक्रम म्हणून समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेचे कॅलेंडर आधीच तयार केले आहे. १० दिवसांच्या कालावधीत आम्ही सर्व सदस्यांना पटवून देण्यात आणि योगाचा समावेश करण्यात यशस्वी झाल्याचे सिंग म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in