महाराष्ट्राच्या अर्जुनवीरांचा गौरव

मुंबईतील विख्यात मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्राच्या अर्जुनवीरांचा गौरव
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे तिरंदाजीतील तारे आदिती स्वामी व ओजस देवतळे यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साताऱ्याची आदिती व नागपूरच्या ओजसने गतवर्षी जागतिक तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

त्याशिवाय मुंबईतील विख्यात मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. खेलरत्न पुरस्कार विजेती बॅडमिंटन जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी एका ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळत असल्याने ते या सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व पॅरा तिरंदाज शीतल देवी यांचाही यावेळी अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. यंदा २६ जणांना अर्जुन, ५ जणांना द्रोणाचार्य, तर ३ जणांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in