वाल्हे : मलेशियामध्ये १८ डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएफ वर्ल्ड स्पेशल ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या चिंतामणी राऊतने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
चिंतामणी राऊत हा विशेष मुलगा आहे. त्याचे वडील बाळासाहेब राऊत आणि कुटुबीयांनी हडपसररहून पुदुच्चेरी येथे राहून चिंतामणीला स्पेशल पॉवरलिफ्टींग खेळाडू म्हणून तयार केले. स्पेशल ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत २७ देश सहभागी झाले होते. त्यात चिंतामणी राऊतने ९३ किलो वजनी गटात या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले. चिंतामणीचे प्रशिक्षक टी. बाकीराज आहेत.