भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! 'या' स्टार खेळाडूने दिले संघात परतण्याचे संकेत

या खेळाडूने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तो गोलंदाजी करताना दिसत आहे
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! 'या' स्टार खेळाडूने दिले संघात परतण्याचे संकेत

भारतीय संघाचा स्टार खेळाडू तसंच हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. भाततीय क्रिकेटप्रेमी बुमराहला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. बुमराहला आशिया कप, टी-२० वर्ल्ड आणि आयपीआय या मोठ्या स्पर्धांना मुकावं लागलं आहे. त्यांच्या सध्या संघातून बाहेर असण्याचा सर्वात जास्त फटहा भारतीय क्रिकेट संघाला बसला आहे. बुमराहचे चाहते त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. त्याच्या भारतीय संघात खेळण्याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नव्हती. अशात बुमराहने स्वत: एक व्हिडिओ शेअर करत संकेत दिले आहेत.

जसप्रीत बुमराहने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तो गोलंदाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांने बीसीसीआयला टॅग केला आहे. या व्हिडिओच्या बॅगग्राऊंडला एक इंग्रजी गाणं वाजत असून त्याचा मराठी अर्थ 'सर्वांना सांगा मी घरी येत आहे', असा होता. बुमराहने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा आनंद हा गगनात मावेना असा झाला आहे. त्यांनी बुमराहला जितकं लवकर कम बॅक करता येईल तेवढं कर असं म्हटलं आहे.

काही चाहत्यांनी बुमराहला आणखी आराम कर पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तु संघात असायलाच हवा, असं म्हटलं आहे. बुमराहने त्याचा शेवटचा सामना २०२२ साली खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो त्रस्त झाला होता. यानंतर त्याने सर्जरी करुन आराम केला होता. मात्र, आता तो संघात परतण्यासाठी सज्ज झाल्याने त्यांच्या चाहत्याना आनंद झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in