महाराष्ट्राच्या गिरीशकडून पहिल्याच दिवशी व्हाईट स्लॅम, महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेला शानदार प्रारंभ

पद्मश्री पुरस्कार विजेते मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
महाराष्ट्राच्या गिरीशकडून पहिल्याच दिवशी व्हाईट स्लॅम, महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेला शानदार प्रारंभ
Published on

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या पर्वाला मंगळवारी दणक्यात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या गिरीश तांबेने तिसऱ्या बोर्डात व्हाईट स्लॅमची नोंद करताना तेलंगणाच्या मोहम्मद शफिउद्दीनवर २५-०, २५-० असे वर्चस्व गाजवले.

तत्पूर्वी. पद्मश्री पुरस्कार विजेते मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी असोसिएशनकडून देशपांडे यांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, कार्याध्यक्ष भरत देसडला, सचिव अरुण केदार, मालदीव असोसिएशनचे सचिव रोशन अली आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या फेरीचे निकाल

सार्थक केरकर (महाराष्ट्र) विजयी वि. एस. नाझीर (तामिळनाडू) १७-१५, ११-८; जे जाहिद (दिल्ली) विजयी वि. इक्बाल नबी (महाराष्ट्र) २०-५, १६-२; असगर शेख (महाराष्ट्र) विजयी वि. प्रशांत मोरे (कर्नाटक) २५-०, १८-५; झहीर पाशा (कर्नाटक) विजयी वि. संतोष डोके (महाराष्ट्र) १८-१६, २५-६.

logo
marathi.freepressjournal.in