आक्षेपार्ह पोस्टनंतर गुजरात टायटन्सचा यश दयाल ट्रोल; चूक लक्षात येताच मागितली माफी

यशने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यावर त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
आक्षेपार्ह पोस्टनंतर गुजरात टायटन्सचा यश दयाल ट्रोल; चूक लक्षात येताच मागितली माफी
Published on

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयाल आयपीएलमध्ये चर्चेत आला होता. केकेआरच्या रिंकू सिंगने त्यांच्या गोलंदाजीवर एकाच षटकात पाच षटकार ठोकले होते. आता पुन्हा यश एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. तसंच तो सोशल मीडियावर ट्रेडिंग होत आहे. यशने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यावर त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दिल्लीतील साक्षी हत्याकांडानंतर यश दयाल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. लव्ह जिहादविषयीची पोस्ट त्याने शेअर केल्याने तो प्रचंड ट्रोल झाला आहे. ट्रोल झाल्याचं लक्षात येताच त्याने माफी मागितली आहे. तसंच आपण सर्व धर्माचा आदर करत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

यशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत एक मुलगा पांढरी गोल टोपी घालून गुडघ्यावर बसला आहे. त्याच्या हातात चाकू असून त्याने तो पाठीमागे लपवला आहे. यावेळी समोर डोळ्याला पट्टी बांधून एक मुलगी उभी आहे. तो गुडघ्यावर बसलेला मुलगा त्या मुलीचा हात हातात घेवू आपल्या प्रेमाची कबुली देत आहे. बाजूला रक्ताच्या थारोळ्यात एक मुलीला मृतदेह पडला असून त्याच्यावर साक्षी असं लिहलं आहे. आजुबाजुला अनेक कबरी असून त्यावर हिंदू मुलींची नावे लिहली आहेत.

या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला द्वेष न पसरवण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी ज्या गुजरात संघात मोहम्मद शमी आणि राशिद खानसोबत खेळताना तो अशा गोष्टी कशा करु शकतो, असा सवाल देखील त्याला विचारला जात आहे. यावेळी अनेकांनी त्याला मुस्लीविरोधी तर अनेकांनी संघी म्हटलं आहे. ट्रोल झाल्यानंतर यशला त्याची चूक लक्षात आली. यानंतर त्याने या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

आपल्याकडून ती पोस्ट चुकन झाली. मी त्याबद्दल माफी मागतो. कृपया द्वेष पसरवू नका. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो. असं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. मात्र तरीदेखील त्याला ट्रोल करणं सुरुच आहे.

logo
marathi.freepressjournal.in