गुकेशला सलामीलाच पराभवाचा धक्का! जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत

भारताच्या डी. गुकेशला सोमवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत पहिल्याच लढतीत चीनच्या डिंग लिरेनकडून पराभव पत्करावा लागला. लिरेनने प्रथम ७.५ गुणांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता गुकेश झोकात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. मंगळवारी दुसरी फेरी रंगणार आहे.
गुकेशला सलामीलाच पराभवाचा धक्का! जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत
Published on

सिंगापूर : भारताच्या डी. गुकेशला सोमवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत पहिल्याच लढतीत चीनच्या डिंग लिरेनकडून पराभव पत्करावा लागला. लिरेनने प्रथम ७.५ गुणांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता गुकेश झोकात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. मंगळवारी दुसरी फेरी रंगणार आहे.

“ही लढत फार वेळ रंगली. मात्र असे घडू शकते. लिरेनला मी मूळीच कमी लेखलेले नाही. या लढतीतील अपयश बाजूला सारून दुसऱ्या फेरीत दमदार पुनरागमन करेन,” असे गुकेश पराभवानंतर म्हणाला.

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरेल आणि जगज्जेतेपद मिळवेल. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल. सोमवारी होणाऱ्या पहिल्या डावात गुकेशला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळणार आहे. तीन डावांनंतर राखीव दिवस असेल.

डिंगने गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला पराभूत करून बुद्धिबळविश्वातील पहिला चिनी जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली आहे. तसेच त्याला नैराश्यालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. गेल्या काही वर्षांपासून आनंदच्या मार्गदर्शनाखालीच गुकेश सराव करत आहे. त्यामुळे आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवण्याची संधी गुकेशकडे आहे.

बुद्धिबळात एकापेक्षा सरस डावपेच आखणाऱ्या १८ वर्षीय गुकेशच्या पाठीशी बहुतांशी बुद्धिबळजगत असले तरी जवळपास १५ दिवस रंगणाऱ्या या लढतीत लिरेन कोणत्याही क्षणी आपल्या भात्यातील अस्त्रे बाहेर काढून गुकेशला नामोहरम करू शकतो. त्यामुळेच लिरेनला सहजासहजी घेण्याची चूक गुकेशला महागात पडू शकते. आता गुकेशकडून झोकात पुनरागमन अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in