राहुल द्रविडसाठी आता कठीण काळ सुरू- साबा करीम

साबा करीम यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना द्रविड आपली कोचिंग कारकीर्द कशी यशस्वी करू शकतो
राहुल द्रविडसाठी आता कठीण काळ सुरू- साबा करीम

राहुल द्रविडसाठी आता कठीण काळ सुरू झाला आहे. आपला हनिमून पिरियड संपल्याची द्रविडला देखील जाणीव झाली आहे. तो परिपूर्ण संघ बनविण्याचा प्रयत्न करीत आहे; पण आतापर्यंत तो अपयशी ठरला आहे, असे मत भारताचे माजी यष्टीरक्षक साबा करीम यांनी व्यक्त केले.

साबा करीम यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना द्रविड आपली कोचिंग कारकीर्द कशी यशस्वी करू शकतो, याचेही उपरोधिक विवेचन केले. त्यांनी सांगितले की, टी-२० किंवा वन-डे सामन्यांपेक्षा भारताने आता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे हाच द्रविड यशस्वी ठरण्यासाठी एक पर्याय आहे. राहुल हा अतिशय हुशार आणि बुद्धिमान आहे. त्यालाही माहीत आहे की, जर त्याला आपले कोचिंग यशस्वी करायचे असेल तर भारतीय संघाने कसोटी मालिका तरी जिंकायलाच हव्यात. ते म्हणाले की, जर भारतीय संघाने या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली, तरच कुठेतरी द्रविड संघाच्या कामगिरीवर खूश असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in