विजय हजारे स्पर्धेचे दोन सामने खेळणार हार्दिक पंड्या

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आपल्या बडोदा संघाकडून विजय हजारे करंडक स्पर्धेतील दोन सामने जानेवारी महिन्यात खेळवण्यात येणार आहे. ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आपल्या बडोदा संघाकडून विजय हजारे करंडक स्पर्धेतील दोन सामने जानेवारी महिन्यात खेळवण्यात येणार आहे. ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

“हार्दिक हा बडोदा संघाकडून ३ आणि ८ जानेवारी रोजी अनुक्रमे विदर्भ आणि चंडीगढविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. ६ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची त्याची इच्छा होती. मात्र निवड समितीने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी त्याला विश्रांती मिळावी, यासाठी त्याला संघात स्थान दिले जाणार नाही,” असे सूत्रांकडून समजते.

logo
marathi.freepressjournal.in