IPL आधीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची तुफान चर्चा, 'तो' व्हिडीओ लिक? म्हणाला - "डायरेक्टर साहेब..."

आयपीएल २०२४ सुरु होण्यापूर्वीच पांड्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. कारण...
IPL आधीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची तुफान चर्चा, 'तो' व्हिडीओ लिक?  म्हणाला - "डायरेक्टर साहेब..."

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद जिंकवून देणाऱ्या रोहित शर्मानंतर आता पांड्याकडे संघाची धुरा असणार आहे. परंतु, आयपीएल २०२४ सुरु होण्यापूर्वीच पांड्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. कारण एका शुटिंगदरम्यान न्युट्रिशन फूड न मिळाल्याने पांड्या सेटवर असलेल्या वेटरवर चांगलाच भडकला आहे. पांड्याला गोड पदार्थ खाण्यासाठी दिल्याने त्याने नाराजी व्यक्त केलीय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, टेबलवर बसलेल्या पांड्याला एक वेटर फूड डीश घेऊन येतो. त्या डीशमध्ये जिलेबी आणि ढोकला असतो. ते पाहताच हार्दिक पांड्या त्या वेटरला चांगलंच सुनावतो. तो म्हणतो, भाई हे काय आहे? मी जिलेबी कशी खाणार, फिटनेस करायचं असतं. हे अॅडजस्ट होणार नाही. हे पदार्थ कुणी पाठवले. माझे शेफ आणि न्यूट्रिशनिस्ट कुठे आहेत? डायरेक्टर साहेबांना बोला हे नाही चालणार. माझा स्टॅमिना खराब होईल.

इथे पाहा हार्दिक पांड्याचा व्हायरल व्हिडीओ

पांड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आयपीएल सुरु होण्यापूर्वी पांड्याच्या फिटनेसचा फंडा एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in