Shubhaman gill: हार्दिक पांड्याची घरवापसी! शुभमन गिल गुजरातचा टायटन्सचा नवा कर्णधार

गुजरात टायटन्सच्या अधिकृत एक्स हँडलवरुन याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
Shubhaman gill: हार्दिक पांड्याची घरवापसी! शुभमन गिल गुजरातचा टायटन्सचा नवा कर्णधार
Published on

भारतीय संघाचा धडाकेबाज ओपनर शुभमन गिगकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गिलला आयपीएलच्या गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधारपदाची जाबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडिय्नस संघात परतल्यानंतर आता संघाची धुरा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल सांभाळणार आहे. गुजरात संघाकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुजरात टायटन्सच्या अधिकृत एक्स हँडलवरुन याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. एक व्हिडिओ पोस्ट करत त्याला "कॅप्टन गिल", असं म्हटलं आहे.

आगामी आयपीएल गतविजेच्या गुजरात टायटन्सला नवा कर्णधार मिळाला असून गुजरात संघाचा माजी कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियस्न संघात परतला आहे. त्यामुळे शुभमन गिलकडे आता गुजरात संघाचं कर्णधारपद मिळालं आहे. आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरु झाली असून सर्व संघांनी कायम आमि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीने हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सकडे सोपवल्यानंतर सोमवारी शुभमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली.

विश्वास ठेवल्याबद्दल आभार

शुभमनल गिलेने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान होत आहे. एवढ्या चांगल्या संघाचं नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार. आम्ही दोन हंगामात विजय मिळवला आहे. मी या रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचं नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.

logo
marathi.freepressjournal.in