हसरंगावर दोन सामन्यांची बंदी; गुरबाझला दंड

मैदानावरील पंच लीडन हॅर्नीबल यांनी चेंडू कंबरेच्या उंचीवर असूनही नो-बॉल न दिल्याने हसरंगाने त्यांच्याशी वाद घातला होता.
हसरंगावर दोन सामन्यांची बंदी; गुरबाझला दंड

दुबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात नो-बॉल न दिल्यामुळे पंचांशी वाद घालणाऱ्या श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय रहमनुल्ला गुरबाझलासुद्धा दंड ठोठावण्यात आला असून त्याच्या सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. गेल्या २४ महिन्यांत हसरंगाच्या नावावर ५ डिमेरीट गुण जमा करण्यात आल्याने हसरंगाला ही शिक्षा ठोठावण्यात आली. मैदानावरील पंच लीडन हॅर्नीबल यांनी चेंडू कंबरेच्या उंचीवर असूनही नो-बॉल न दिल्याने हसरंगाने त्यांच्याशी वाद घातला होता. तर गुरबाझने पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in