आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा हा ठरला पाचवा खेळाडू

याआधीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकले आहे
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा हा ठरला पाचवा खेळाडू

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला. एएफसी आशियाई चषक स्पर्धेच्या पात्रता सामन्यात हा रेकॉर्ड केला. या सामन्यात सुनील छेत्रीने ८४ वा गोल केला. यासोबतच छेत्रीने रिअल मॅद्रिदचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलपटू फेरेंक यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. छेत्रीने याआधीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकले आहे.

छेत्रीने याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये पेले यांच्या ७७ गोलचा विक्रम मोडला होता. छेत्री सध्या सक्रीय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी फक्त रोनाल्डो आणि मेस्सीच्या मागे असून यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोच्या नावे ११७ गोल आहेत. मेस्सीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८६ गोल केले असून चौथ्या क्रमांकावर आहे.

मेस्सीपेक्षा फक्त दोन गोल मागे

छेत्रीने आणखी सहा गोल केल्यास तो मेस्सीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या इराणचे अली देई १०९ गोलसोबत दुसऱ्या क्रमांकावर आणि मलेशियाचे मुख्तार दाहरी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुख्तार दाहरीने आपल्या करिअरमध्ये ८९ आंतरराष्ट्रीय गोल केले.

दरम्यान, भारतीय फुटबॉल संघाने कोलकातामध्ये १४ जूनला एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हाँगकाँग संघाला ४-० ने धुळ चारली. भारतीय संघ या सामन्याआधीच एएफसी आशियाई कप २०२३ साठी पात्र ठरला होता. हाँगकाँगविरोधात सामन्यात भारताकडून अन्वर अली, सुनील छेत्री, मानवीर सिंह आणि इशान पंडिता यांनी गोल केले.

भारताने कंबोडियाचा २-० ने पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. या सामन्यात दोन्ही गोल छेत्रीने केले होते. दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधाराने अफगाणिस्तानविरोधात एक गोल करत विजयाचा पाया रचला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in