एका वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा हा खेळाडु ठरला सहावा कर्णधार

विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले
एका वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा हा खेळाडु ठरला सहावा कर्णधार
Published on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतून बाहेर पडलेल्या के एल राहुलमुळे पंतला कर्णधारपदाची संधी मिळाली आहे. ऋषभ पंत एका वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा सहावा कर्णधार ठरला.

विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले. नंतर कोहलीला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमवावे लागले. त्याचबरोबर या वर्षाच्या सुरुवातीला कोहलीनेही कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला होता.

कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले. नंतर कोहलीला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमवावे लागले. या वर्षाच्या सुरुवातीला कोहली कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. कोहलीने २०२१ च्या टी-२० विश्वचषकामधून राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.

अजिंक्य रहाणेने नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत संघाचे नेतृत्व केले. रहाणेचा इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यासाठीही कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

सलामीवीर शिखर धवनने गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. सलामीवीर शिखर धवनने गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते.

के एल राहुलने गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. केएल राहुलने गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते.

logo
marathi.freepressjournal.in