इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत या दोघांनी पटकावले विजेतेपद

भारताची अन्य स्पर्धक आकर्षी कश्यपला मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला
इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत या दोघांनी पटकावले विजेतेपद

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी बुधवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.

जकार्ता येथे सुरू असलेल्या या सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेत महिला एकेरीत चौथ्या मानांकित सिंधूने डेन्मार्कच्या लिन ख्रिस्टोफरसेनचा १८-२१, २१-१५, २१-११ असा पिछाडीवरून तीन गेममध्ये पराभव केला. सिंधूची पुढील फेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया तुंगजुंगशी गाठ पडेल. भारताची अन्य स्पर्धक आकर्षी कश्यपला मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या बेविन झँगने आकर्षीला २१-१२, २१-११ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. पुरुष एकेरीत सातव्या मानांकित लक्ष्यने डेन्मार्कच्या क्रिस्टियन सोलबर्गवर २१-१०, २१-१८ असे सहज वर्चस्व गाजवले. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर डेन्मार्कच्याच रॅस्मस गेमकेचे आव्हान असेल. भारताच्या समीर वर्माला मात्र आगेकूच करण्यात अपयश आले. इंडोनेशियाच्या चिको ऑराने समीरवर २१-१७, २१-१५ अशी मात केली.

सात्ित्वकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या अनुपस्थितीत भारताच्या पुरुष दुहेरीतील जोडीने निराशा केली. इंडोनेशियाच्या येरेमिया याकूब आणि प्रमुद्य रियांटो यांनी बी. सुमित रेड्डी आणि मनू अत्री या भारतीय जोडीवर १९-२१, २१-११, २१-८ अशी पिछाडीवरून सरशी साधली. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांची जोडीही पराभूत झाली. पुस्पिता सारी व रॅचेल रोझ या इंडोनेशियन जोडीने अश्विनी-रेड्डी यांच्यावर २१-१८, २१-९ असे प्रभुत्व मिळवले. त्याशिवाय मिश्र दुहेरीत इशान भटनागर आणि तनिशा क्रॅस्टो या भारतीय जोडीचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in