Olympics: ऑलिम्पिकसाठी हॉकी संघ जाहीर; हरमनप्रीतकडे यंदा नेतृत्वाची धुरा

Harmanpreet Singh: पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा १६ सदस्यीय पुरुष हॉकी संघ बुधवारी जाहीर करण्यात आला.
Olympics: ऑलिम्पिकसाठी हॉकी संघ जाहीर; हरमनप्रीतकडे यंदा नेतृत्वाची धुरा
Twitter
Published on

Hockey Team India: नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा १६ सदस्यीय पुरुष हॉकी संघ बुधवारी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेसाठी हरमनप्रीत सिंगकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. २०२१मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनप्रीत सिंगने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र यंदा तो खेळाडू म्हणून संघाचा भाग असेल.

टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकची थेट पात्रता मिळवली. हरमनप्रीत हा ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करणारा २२वा कर्णधार ठरणार आहे. हार्दिक सिंगला उपकर्णधारपद देण्यात आले असून पी. आर. श्रीजेश, मनप्रीत सिंग यांच्या कारकीर्दीतील ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा असेल. तसेच भारतीय संघात पाच जण प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळतील. कर्णधार हरमनप्रीतची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा असेल. भारताचा महिला संघ मात्र यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड व आयर्लंड यांसारख्या बलाढ्य संघांसह ब-गटात समावेश करण्यात आला आहे. ब-गटात नेदरलँड्स, जर्मनी, ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका व यजमान फ्रान्स हे संघ आहेत. गटातून आघाडीचे चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय खेळाडू सध्या बंगळुरू येथील साइ केंद्रात सराव करत आहेत. क्रेग फुल्टन भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in