झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात हुडाने केला विश्वविक्रम

दीपक हुडाने दुसऱ्या वन-डे सामन्यात महत्त्वपूर्ण २५ धावा केल्या आणि एक विकेटदेखील घेतली.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात   हुडाने केला विश्वविक्रम

भारताने पाच विकेट्स राखून जिंकलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज दीपक हुडाने विश्वविक्रम केला. पदार्पणानंतर सर्वाधिक सलग सामने जिंकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर जमा झाला. दीपकच्या पदार्पणापासून भारतीय संघाने आतापर्यंत सलग १६ सामने जिंकले आहेत. यापूर्वी हा विश्वविक्रम रोमानियाच्या सॅटव्हिक नादीगोटला याच्या नावावर होता. त्याच्या पदार्पणानंतर रोमानियाने सलग १५ सामने जिंकले होते.

दीपक हुडाने दुसऱ्या वन-डे सामन्यात महत्त्वपूर्ण २५ धावा केल्या आणि एक विकेटदेखील घेतली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in