FIFA विश्वचषक अंतिम सामन्यासाठी बारची वेळ वाढवा; हॉटेल ॲँड रेस्टॉरंट असोसिएशनची विनंती

‘फिफा’ विश्वचषक अंतिम सामना रविवारी रात्रौ १२.३० वाजता होणार आहे. स्पेन विरुद्ध अर्जेंटिना या सामन्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. या अंतिम सामन्यासाठी बार व रेस्टॉरंटची वेळ वाढवून द्यावी, अशी विनंती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) ने महाराष्ट्र सरकारला केली आहे.
FIFA विश्वचषक अंतिम सामन्यासाठी बारची वेळ वाढवा; हॉटेल ॲँड रेस्टॉरंट असोसिएशनची विनंती
FIFA विश्वचषक अंतिम सामन्यासाठी बारची वेळ वाढवा; हॉटेल ॲँड रेस्टॉरंट असोसिएशनची विनंती'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

स्वीटी भागवत/ मुंबई

‘फिफा’ विश्वचषक अंतिम सामना रविवारी रात्रौ १२.३० वाजता होणार आहे. स्पेन विरुद्ध अर्जेंटिना या सामन्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. या अंतिम सामन्यासाठी बार व रेस्टॉरंटची वेळ वाढवून द्यावी, अशी विनंती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) ने महाराष्ट्र सरकारला केली आहे.

राज्यातील परवानाधारक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील परमिट रूम आणि बारच्या कामकाजाच्या वेळेत वाढ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांना फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहता येईल. तसेच आम्ही सरकारचे सर्व नियम काटेकोरपणे पाळू असे आश्वासन संघटनेने दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात, संघटनेने परवानाधारक आस्थापनांना सोमवार, २० जुलै रोजी पहाटे ३:३० वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी मागितली आहे, असे संस्थेने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in