भारतीय संघातील 'हा' खेळाडू स्पेशल या मताशी मी सहमत नाही, मांजरेकरांचे स्पष्ट मत

भारतीय संघाच्या कामगिरीवरच नाही तर संघाच्या निवडीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत
भारतीय संघातील 'हा' खेळाडू स्पेशल या मताशी मी सहमत नाही, मांजरेकरांचे स्पष्ट मत

भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम मुकाबला इंग्लंडच्या ओव्हल मैदावर पार पडला. या महाअंतिम सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियावर २०९ धावांनी विजय मिळवत विश्व चषकावर आपलं नाव कोरलं. भारतीय संघाला कसोटीच्या या अंतिम सामन्यात एकाही दिवसाच्या खेळावर आपलं वर्चस्व गाजवला आलं नाही. या सामान्यात टीम इंडियाच्या खेळावर सर्वजण नाराज झाले असून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. भारतीय संघाच्या खेळावर अनेक माजी खेळाडूंनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

यावेळी फक्त भारतीय संघाच्या कामगिरीवरच नाही तर संघाच्या निवडीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी संघाच्या एक खेळाडूबद्दल स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.

यावेळी ते म्हणाले की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडे दोन विकेटकीपर बॅट्समन होते. इशान किशन आणि केएस भरत. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी इशानला बसवून केसएस भरतला संधी दिली. खरतर केएस भरतला अजूनपर्यंत प्रभावी कामगिरी करता आली नाही. आपल्या देशात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो अपयशी ठरला होता. WTCच्या अंतिम सामन्यात देखील तीच परिस्थिती होती.

यावेळी बोलताना मांजरेकर यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. इतराप्रमाणे मला केएस भरतमध्ये काही स्पेशल दिसत नाही. केएस भरत स्पेशल आहे, या मताशी मी सहमत नाही. असं संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

केएस भरत हा मुळचा आंध्र प्रदेशचा आहे. तो पहिल्या इंनिंगमध्ये १५ चेंडूत ५ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलँडने त्याला बोल्ड केलं. दुसऱ्या इंनिंगमध्ये त्याने ४१ चेंडूत २३ धावा करत थोडी बरी कामगिरी केली. यष्टीरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in