जेव्हा कारकीर्दीची सुरुवात केली, तेव्हा मी भारताच्या झहीर खानची गोलंदाजी सातत्याने पाहायचो. त्याच्याशी संवाद साधल्यावर मला भरपूर काही शिकण्यास मिळाले, असे इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन याने सांगितले. ४१ वर्षीय अँडरसनने १८५ कसोटीत ६९८ बळी मिळवले असून पुढील कसोटीत त्याला ७०० बळींचा टप्पा गाठण्याची संधी आहे. अशी कामगिरी करणाता तो विश्वातील फक्त तिसरा गोलंदाज ठरू शकतो.
“झहीरची गोलंदाजी मी नेहमीच आर्वजून पाहायचो. त्याची रिव्हर्स स्विंग करण्याची कला कौतुकास्पद होती. भारतीय संघाविरुद्ध खेळताना मी त्याच्याशी नेहमी संवाद साधून बरेच काही शिकायचो,” असे अँडरसन म्हणाला.