ICC Men’s U19 World Cup announced: २०२४ साली दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या U19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर

२९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या भारत-इंग्लड-दक्षिण आफ्रिका या तिरंगी मालिकेत देखील हाच संघ खेळणार आहे.
ICC Men’s U19 World Cup announced: २०२४ साली दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या U19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर
Published on

पुढच्या वर्षी(२०२४) दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या १९ वर्षाखालील वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेत पाच वेळच्या विजेत्या भारतीय संघाचा पहिला सामना २०२० सालचा विजेत्या बांगलादेश संघाविरुद्ध होणार आहे. ब्लोएमफोंटेन येथे हा सामना होणार आहे. तर यजमान दक्षिण आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिज संघाचा सामना करणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज(१२ डिसेंबर) घोषणा करण्यात आली असून हाच संघ २९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या भारत-इंग्लड-दक्षिण आफ्रिका या तिरंगी मालिकेत देखील खेळणार आहे.

या स्पर्धेत एकूण १६ संघांचा समावेश असून ५ वेगवेगळ्या मैदानावर ४१ सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाला अ गटात बांगलादेश, आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे. तर ब गटात इंग्लंड, दक्षिम आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड; क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया, तर ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड व नेपाळ या संघांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या १९ वर्षाखालील वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघ -

  1. अर्शीन कुलकर्णी

  2. आदर्श सिंग

  3. रुद्रा मयूर पटेल

  4. सचिन धस

  5. प्रियांशू मोलिया

  6. मुशीर खान

  7. उदय सहरान(कर्णधार)

  8. अरावेली अवनिश राव (यष्टिरक्षक)

  9. सॅमी कुमार पांडे(उपकर्णधार)

  10. मुरुगन अभिषेक

  11. इग्नेश महाजन

  12. धनुश गोवडा

  13. आराध्य शुक्ला

  14. राज लिंबानी

  15. नमन तिवारी(तिरंगी मालिकेसाठी)

राखीव खेळाडू

  1. प्रेम देवकर

  2. अंश गोसाई

  3. मोहम्मद अमन

अन्य राखीव खेळाडू

  1. दिग्विजय पाटील

  2. जयंत गोयत

  3. पी विग्नेश

  4. किरण चोरमाळे

भारताचे सामने

२० जानेवारी बांगलादेश विरुद्ध

२५ जानेवारी आयर्लंड विरुद्ध

२८ जानेवारी अमेरिका विरुद्ध

logo
marathi.freepressjournal.in