ICC T20 World Cup : बुमराहनंतर भारताचा आणखी एक गोलंदाज संघाबाहेर

भारताचा पहिलाच सामना हा पाकिस्तानसोबत असणार आहे. आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ही योग्य संधी असल्याची चर्चा
ICC T20 World Cup : बुमराहनंतर भारताचा आणखी एक गोलंदाज संघाबाहेर

आयसीसी टी-२० सुरु (ICC T-20 World Cup) होण्याआधीच भारतीय संघाच्या (Team India) मागे लागलेली साडेसाती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. एका मागोमाग एक महत्वाचे खेळाडू जायबंदी होत संघाच्या बाहेर होत आहेत. संघाचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आधीच संघाबाहेर असताना दीपक चहरचा (Deepak chahar) समावेश करण्यात आला होता. मात्र पाठीच्या दुखण्यामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्याचे वृत्त समोर येत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दीपक चहरच्या जागी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर गुरुवारी, 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. 

भारताचा पहिलाच सामना हा पाकिस्तानसोबत असणार आहे. आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ही योग्य संधी असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये होत आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in