
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटच्या वर्तुळात जसप्रीत बुमराह T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर गोलंदाजीची प्रमुख धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत अनेक शक्यता पडताळण्यात येत होत्या. अखेर टीम इंडियात जसप्रीत बुमराहच्या जागी खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराह पाठीच्या ताणामुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला. आता त्याच्या जागी शमीचा समावेश करण्यात आला आहे. याआधी मोहम्मद शमीची स्टँडबाय म्हणजेच राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. मात्र आता त्याची मुख्य संघात निवड झाली आहे. मोहम्मद शमीचा अनुभव लक्षात घेता तो या जागेचा प्रमुख दावेदार होता.
असा असेल भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शामी.