ICC Test Rankings : ऋषभ पंत आठव्या, शुभमन गिल दहाव्या स्थानी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जारी केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिल यांनी पहिल्या दहामध्ये स्थान कायम राखले आहे.
ICC Test Rankings : ऋषभ पंत आठव्या, शुभमन गिल दहाव्या स्थानी
ICC Test Rankings : ऋषभ पंत आठव्या, शुभमन गिल दहाव्या स्थानीPTI
Published on: 

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जारी केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिल यांनी पहिल्या दहामध्ये स्थान कायम राखले आहे. पंत आठव्या, तर गिल दहाव्या स्थानावर आहेत. मात्र, दोघांच्याही क्रमवारीत प्रत्येकी एका स्थानाची घसरण झाली आहे.

पंतच्या खात्यात ७१३, तर गिलच्या खात्यात ६९७ रेटिंग गुण आहेत. भारताचा आणखी एक फलंदाज यशस्वी जैस्वाल १३व्या स्थानावर आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचे हॅरी ब्रूक आणि जो रूट अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे त्यानंतरच्या स्थानांवर आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानचा कर्णधार रहमत शाह याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आयसीसीच्या कसोटी खेळाडूंच्या कोणत्याही प्रकारातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा तो अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध शारजाह येथे झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने १७३ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याने सहा स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम सातवे स्थान मिळवले.

गोलंदाजीत बुमरा पाचव्या स्थानी

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सेन, न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि इंग्लंडचा ओली रॉबिन्सन हे अनुक्रमे पुढील स्थानांवर आहेत. कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मार्को यान्सेन अव्वल स्थानावर आहे. भारताचा वॉशिंग्टन सुंदर सातव्या स्थानावर आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)