ICC Test Rankings : गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह पुन्हा अग्रस्थानी; यशस्वीची मोठी झेप!

आयसीसीच्या जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराहने पुन्हा अग्रस्थान काबिज केले. तर, फलंदाजांमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल १० खेळाडूंत परतला.
ICC Test Rankings : गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह पुन्हा अग्रस्थानी; यशस्वीची मोठी झेप!
Published on

नवी दिल्ली : आयसीसीच्या जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराहने पुन्हा अग्रस्थान काबिज केले आहे. तसेच फलंदाजांच्या यादीत मुंबईकर यशस्वी जैस्वालने मोठी झेप घेत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

बांगलादेशविरुद्ध नुकताच झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने ६ बळी मिळवले. त्याने भारताच्या रविचंद्रन अश्विनवर अवघ्या १ गुणाने सरशी साधून अग्रस्थान पटकावले. बुमराहच्या खात्यात ८७०, तर अश्विनकडे ८६९ गुण जमा आहेत. अश्विन बांगलादेशविरुद्ध मालिकावीर ठरला. मात्र दुसऱ्या कसोटीत बुमराहच्या तुलनेत त्याची कामगिरी फिकी पडली. रवींद्र जडेजा ८०९ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे.

फलंदाजांमध्ये बांगलादेशविरुद्ध २ कसोटींत ३ अर्धशतक झळकावणारा यशस्वी ७९२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच विराट कोहली पुन्हा अव्वल १० खेळाडूंत परतला असून तो ७२४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जो रूट या यादीत अग्रस्थानावर आहे.

logo
marathi.freepressjournal.in