विराटने विश्वचषकात सलामीला येणे जोखमीचे: हरभजन

आयपीएलमध्ये तो सलामीला यशस्वी होत असला, तरी टी-२० विश्वचषकात तो...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : विराट कोहली टी-२० विश्वचषकात सलामीला आल्यास ते जोखमीचे ठरू शकते. तो भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावरच योग्य आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने नोंदवले.

२ जूनपासून रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा व विराटने सलामीला यावे, अशी मागणी काही माजी क्रिकेटपटू तसेच चाहते करत आहेत. विराटने यंदा बंगळुरूकडून सलामीला येत ७४१ धावा केल्या. यामध्ये ५ अर्धशतके व १ शतकाचाही समावेश होता. “विराटने भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर नेहमी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये तो सलामीला यशस्वी होत असला, तरी टी-२० विश्वचषकात तो तिसऱ्या क्रमांकावरच येणे भारतासाठी सोयीचे ठरेल. तो परिस्थितीनुसार खेळून संघाला सावरू शकतो तसेच आक्रमणही करू शकतो. त्यामुळे विराटच्या स्थानाशी भारताने कोणतीही जखम पत्करू नये,” असे ४३ वर्षीय हरभजन म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in