इगा स्विआटेक विम्बल्डनची नवी राणी; पहिल्यांदाच पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद

पोलंडच्या इगा स्विआटेकने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाला अंतिम सामन्यात ६-०, ६-० असे पराभूत करत पहिल्यांदाज विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्विआटेकाने ऐतिहासिक कामगिरी केली.
इगा स्विआटेक विम्बल्डनची नवी राणी; पहिल्यांदाच पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद
Photo : X (@TennisHalloFame)
Published on

लंडन : पोलंडच्या इगा स्विआटेकने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाला अंतिम सामन्यात ६-०, ६-० असे पराभूत करत पहिल्यांदाज विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. शनिवारी झालेल्या या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्विआटेकाने ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेच्या १४४ वर्षांच्या इतिहासात महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूला एकही गेम जिंकता आला नाही.

सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात स्विआटेकने केवळ ५७मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडूला धूळ चारली. तिचा हा एकूण सहावा ग्रँड स्लॅम किताब ठरला. २४ वर्षांच्या पोलंडच्या स्विआटेकने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली होती. शेवटपर्यंत तिने सामना आपल्या ताब्यात ठेवला. अनिसिमोव्हाने काही चुका केल्या. त्याचा फटका तिला बसला.

स्विआटेककडे आधीच फ्रेंच ओपनच्या लाल मातीवरील चार ट्रॉफी आणि यू.एस. ओपनच्या हार्ड कोर्टवरील एक ट्रॉफी होती, पण हे तिचे व्यावसायिक कारकिर्दीतील गवताच्या कोर्टवरील पहिलेच विजेतेपद आहे. विजयासह तिने बराच काळ चालू असलेला विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in