जामनेरच्या दंगलीत शेखच 'सिकंदर', नमो कुस्ती महाकुंभात उसळला चाहत्यांचा जनसागर

नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचाच जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खान्देशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला.
जामनेरच्या दंगलीत शेखच 'सिकंदर', नमो कुस्ती महाकुंभात उसळला चाहत्यांचा जनसागर

जामनेर : नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचाच जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खान्देशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. जामनेर येथील स्टेडियममध्ये सोलापूरचा सिकंदर शेख, सायगावचा विजय चौधरी आणि पंजाबच्या प्रीतपालच्या कुस्तीचा मनमुराद थरार कुस्तीप्रेमींना तब्बल सात तास घेतला.

या कुस्ती दंगलमध्ये सोलापूरचा सिकंदर शेखने जम्मू काश्मीरच्या बिनिया मिनला छडी टांग लावत अस्मान दाखवले. या कुस्तीसाठी पंच म्हणून स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे होते. सायगावच्या विजय चौधरी विरुद्ध मुस्तफा खान या अटीतटीच्या लढतीत मुस्तफाला विजयने घुटना डावावर चितपट केले. पंजाबच्या प्रितपालने दिल्लीच्या संती कुमारला भारली या डावावर अवघ्या २ मिनिटात चीतपट केले. असाच जोरदार खेळ माऊली कोकाटेने करून दाखवला. त्याने उत्तर भारतातील तगडा पैलवान अजय गुज्जरला टांग डावावर चीतपट केले. या मैदानात १५० मल्लांनी आपल्या खेळाचे प्रदशर्न केले. या सर्व विजेत्या पैलवानांना मंत्री गिरीष महाजन यांनी १५ गदा, मानाचा ‘नमो कुस्ती महाकुंभ’चा पट्टा आणि लाखोंचे बक्षिसे देऊन गौरवले. यावेळी विजय यांनी कुस्ती जिंकल्यानंतर त्यांनी गिरीष महाजन यांनाच खांद्यावर घेऊन आपला आनंद व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in