किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्राप्तीला सुवर्ण तर विघ्नेशला कांस्यपदक

या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहराध्यक्ष उमेश मुरकर यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले
किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्राप्तीला सुवर्ण तर विघ्नेशला कांस्यपदक

चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलात झालेल्या वाको इंडिया सिनिअर नॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबई शहरतर्फे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना प्राप्ती रेडकर हिने महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकाविले; तर विघ्नेश मुरकर याने कांस्यपदक मिळविले. मुंबई शहराकडून अथर्व घाटकर व साहिल बापेरकर यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

प्राप्ती रेडकर के सी कॉलेज, चर्चगेटमध्ये शिकत आहे, तर विघ्नेश मुरकर एसआयईएस कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्स, शीव येथे शिकत आहे. या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहराध्यक्ष उमेश मुरकर यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी शितो रीयु स्पोर्ट्स कराटे अॅण्ड किकबॉक्सिंग असोसिएशन व गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट या संस्थांनीही या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे योगदान मिळाले.

वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष अग्रवाल व बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. प्राप्ती रेडकरने क्राईम पेट्रोल सारख्या अनेक मराठी व हिंदी मालिकांमधून काम केले आहे. किकबॉक्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा व एशियन स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्णपदक पटकाविण्याचा मानस या प्रसंगी प्राप्तीने व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in