IND vs AUS : हेझलवूडला विश्रांती; भारताला धावा जमवण्याची संधी; मालिकेतील तिसरा T20 सामना आज

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे भारताला फलंदाजीत कामगिरी उंचावण्याची संधी आहे. मात्र भारतीय संघातून वेगवान गोलंदाज अर्शदीपला वगळल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी मालिकेतील तिसरा टी-२० सामना होणार आहे.
IND vs AUS : हेझलवूडला विश्रांती; भारताला धावा जमवण्याची संधी; मालिकेतील तिसरा T20 सामना आज
Photo : BCCI
Published on

होबर्ट : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे भारताला फलंदाजीत कामगिरी उंचावण्याची संधी आहे. मात्र भारतीय संघातून वेगवान गोलंदाज अर्शदीपला वगळल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी मालिकेतील तिसरा टी-२० सामना होणार आहे.

अचूक टप्प्यावर हेझलवूडची सातत्याने गोलंदाजी करण्याची क्षमता आणि त्यातून होणारा उसळीचा त्रास हे भारतीय फलंदाजांसमोर आव्हान ठरत आहे.

या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या 'ॲशेस' कसोटी मालिकेपूर्वी हेजलवूडला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो उर्वरित मालिकेत खेळणार नाही. भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे. हेझलवूड अप्रतिम गोलंदाज आहे, असे भारताचा सलामीवीर फलदाज अभिषेक शर्मा म्हणाला.

हेझलवूडच्या अनुपस्थितीमुळे भारतीय फलंदाजांना झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस किंवा सीन अबॉटसारख्या गोलंदाजांविरुद्ध आत्मविश्वासाने खेळता येईल.

होबार्टमधील बेलरिव्ह ओव्हल मैदानाची सीमारेषा लहान असल्याने त्याचा फायदा फलंदाजांना होणार आहे. कारण एखादा उंच फटका सहज सीमारेष ओलांडू शकतो. याच बेलरिव्ह ओव्हलवर २०१२ साली विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध ८६ चेंडूंमध्ये नाबाद १३३ धावांची शानदार खेळी खेळली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने सरशी साधली.

logo
marathi.freepressjournal.in