IND vs AUS : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; ऑस्ट्रेलिया १७७ धावांत आटोपला तर भारत ७७ वर १ बाद, अश्विन-जडेजाच्या फिरकीची कमाल

भारत ऑस्ट्रेलियाच्या (IND vs AUS) पहिल्या कसोटीत रवींद्र जाडेजाने घेतले ५ विकेट्स, तर अश्विनने ३ विकेट घेत केला रेकॉर्ड
IND vs AUS : पहिल्या दिवसाचा खेळ संपला;  ऑस्ट्रेलिया १७७ धावांत आटोपला तर भारत ७७ वर १ बाद, अश्विन-जडेजाच्या फिरकीची कमाल

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानात खेळवण्यात येत आहे. सामान्यांच्या पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १७७ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेनने ४९ तर अ‍ॅलेक्स कॅरीने ३७ धावांची सर्वाधिक खेळी केली. मात्र, इतर कोणत्याही फलंदाजाला तग धरता आला नाही. भारताकडून रवींद्र जाडेजाने एकाच डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तर, आर. अश्विनने ३ विकेट्स घेतल्या. डावाच्या सुरुवातीलाच शमी आणि सिराजच्या प्रत्येकी १ विकेट घेत भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शमी - सिराज या जोडीने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजासारख्या तंगड्या फलंदाजाला माघारी धाडले. त्यानंतर रवींद्र जडेजाने अचूक मारा करत ऑस्ट्रेलिया संघ ५ फलंदाज तंबूत पाठवले. तर, अश्विनने आपल्या फिरकीची जादू दाखवत ३ फलंदाजांना बाद केले. विशेष म्हणजे जडेजाने ११ वेळा एकाच डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर, आर अश्विननेदेखील कसोटीमध्ये ४५० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने ८९ कसोटी सामन्यात ही कामगिरी केली असून जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने हा टप्पा पार करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in