IND vs BAN Test : अवघ्या १४५ धावांचा पाठलाग करताना भारताचे ४ दिग्गज फलंदाज माघारी

IND vs BAN Test : अवघ्या १४५ धावांचा पाठलाग करताना भारताचे ४ दिग्गज फलंदाज माघारी

भारत आणि बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटीत (IND vs BAN Test) भारतीय संघासमोर १४५ धावांचे माफक आव्हान असताना दिग्गज फलंदाज माघारी

भारत आणि बांगलादेशमधील दुसरा कसोटी (IND vs BAN Test) सामना हा रंजक वळणावर येऊन पोहचला आहे. सामान्यांच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने भारतासमोर १४५ धावांचे आव्हान समोर ठेवले. मात्र, सध्या भारताची परिस्थिती ही ४५ धावांवर ४ विकेट्स अशी झाली आहे. माफक धावांचे आव्हान समोर असताना भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतले. आता भारताला चौथ्या दिवशी १०० धावांची गरज असताना बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारत आणि बांगलादेशमधील दुसरा कसोटी सामना शेरे बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. अशामध्ये बांगलादेशने पहिल्या डावामध्ये २२७ धावांची खेळी केली. तर याउलट भारताने ३१४ धावा केल्या आणि ८० धावांनी आघाडीवर राहिला. यानंतर दुसऱ्या डावामध्ये बांगलादेशचा संघ कडवी झुंज देत असताना गोलंदाजीचा अचूक मारा करत संपूर्ण संघ २३१ धावांवर सर्वबाद केला. यावेळी लिटन दास आणि झाकीर हसन यांच्या अर्धशतकांनी बांग्लादेशच्या संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलंदाज भारतासमोर टिकू शकले नाहीत. अक्षर पटेलने ३ विकेट्स घेतल्या तर सिराज आणि अश्विनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. उमेश यादव आणि जयदेव उनाडकतला यावेळी फक्त १-१ विकेटच मिळवता आल्या.

१४५ धावांचे माफक आव्हान असताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली अशी दिग्गज फळी स्वस्तात माघारी परतली. तिसरा दिवस संपला तेव्हा तेव्हा भारत ४५ वर ४ अशा स्थितीमध्ये होता. तर, अक्षर पटेल २६वर आणि जयदेव उनाडकत ३ वर नाबाद खेळत आहेत. बांग्लादेशकडून मेहंदी हसन मिराजने तीन विकेट्स घेतल्या. तर, शाकीब अल हसनला एक विकेट मिळाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in